• सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल श्री. अर्जुन सुब्रमण्यम यांनी 'फुल स्पेक्ट्रम: इंडियाज वॉर्स, १९७२-२०२० (Full Spectrum: India’s Wars, १९७२-२०२०)' हे नवीन पुस्तक लिहीले आहे. ‘इंडियाज वॉर्सः अ मिलिटरी हिस्ट्री, १९४७-१९७१ (India’s Wars: A Military History, १९४७-१९७१)’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकाचा हा पुढील भाग आहे.

पुस्तकाबाबत ठळक मुद्दे

  • गेल्या ५ दशकांतील समकालीन भारतातील युद्धाचा आणि विवादाचा सर्वसमावेशक लेखा सदर पुस्तकात दाखविण्यात आला आहे.

  • हार्परकोलिन्स पब्लिशर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (HarperCollins Publishers India Pvt. Ltd) द्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येईल.

  • सशस्त्र दल सहभागी झालेल्या सर्व मोठ्या ऑपरेशन्सचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.