-
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत (International Olympic Committee - IOC) नुकतेच उत्तर कोरियाला २०२२ च्या बीजिंग हिवाळी ऑलिंपिकमधून औपचारिकरित्या निलंबित करण्यात आले होते.
ठळक मुद्दे
-
कोविड-१९ महामारीचे कारण देत टोकियो गेम्समध्ये आपला संघ पाठवण्यास त्यांनी नकार दिला होता.
-
या कृतीबद्दल त्यांना शिक्षा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
IOC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IOC म्हणजेच 'International Olympic Committee' अर्थात 'आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती' होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: लॉझने, स्वित्झर्लंड हे IOC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: थॉमस बाख हे सध्या IOC चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: २३ जून १८९४ रोजी IOC ची स्थापना करण्यात आली होती.