• अंबाला येथील हवाई दलाच्या स्टेशनवर ५ राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचे औपचारिकपणे भारतीय वायुसेनेत (Indian Air Force - IAF) सामीलीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • अंबाला येथील भारतीय वायुसेनेच्या १७ स्क्वॉड्रन ‘Golden Arrows’ मध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

  • ही राफेल विमाने फ्रान्सहून रवाना करण्यात आली आहेत.

  • सदर विमाने जेट फ्रेंच एरोस्पेस मेजर डसॉल्ट एव्हिएशन (Dassault Aviation) यांनी बनविली आहेत.

भारतीय वायुसेनेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • प्रमुख: राकेश कुमारसिंग भदौरिया हे वायुसेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IAF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.