-
फोर्ब्समार्फत (Forbes) नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या २०२१ सालच्या 'जगातील सर्वोत्तम नियोक्ता (World’s Best Employer)' क्रमवारीत 'रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)' भारतीय कॉर्पोरेट्समध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.
ठळक मुद्दे
-
जागतिक स्तराचा विचार केल्यास रिलायन्स ७५० जागतिक कंपन्यांमध्ये ५२ व्या स्थानावर विराजमान झाली आहे.
-
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने २०२१ सालची जगातील सर्वोत्तम नियोक्ती कंपनी म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे.
-
त्यानंतर IBM, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, अॅपल, अल्फाबेट आणि डेल टेक्नॉलॉजीज यांचा क्रमांक लागतो.