-
फोर्ब्स (Forbes) मासिकाने २०२० मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा एकमेव भारतीय स्टार आहे ज्याने २०२० मध्ये जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पहिल्या १० अभिनेत्यांमध्ये स्थान मिळविले आहे. त्याची एकूण कमाई ४८.५ दशलक्ष डॉलर्स आहे.
ठळक मुद्दे
-
कुस्तीपटू ते चित्रपट अभिनेता असा प्रवास करणाऱ्या ड्वेन जॉन्सनने सलग दुसर्या वर्षी ८७.५ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. जॉन्सनला 'द रॉक' म्हणून देखील ओळखले जाते.
-
अक्षय कुमार फोर्ब्सच्या यादीत ६ व्या स्थानावर आहे.
-
त्याचे बहुतांश उत्पन्न हे उत्पादनाच्या समर्थनांमधून प्राप्त झाले आहे.
-
सदर यादीच्या प्रसिद्धीकरिता १ जून २०१९ ते १ जून २०२० या कालावधीत होणारी कमाई लक्षात घेतली गेली आहे.
फोर्ब्स मासिकाच्या २०२० च्या यादीमध्ये सर्वाधिक मानधन प्राप्त करणारे कलाकार
-
ड्वेन जॉन्सन
-
रायन रेनोल्ड्स
-
मार्क वहलबर्ग
-
बेन एफलेक
-
विन डिझेल
-
अक्षय कुमार