-
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वामध्ये मध्य प्रदेश सरकारमार्फत राज्यात गायींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ‘गौ कॅबिनेट (Gau Cabinet)’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
पशुसंवर्धन, वने, पंचायत व ग्रामीण विकास, महसूल, गृह व शेतकरी कल्याण इ. विभागांचा सदर प्रस्तावित मंत्रिमंडळात समावेश असेल.
-
मंत्रिमंडळाची पहिली बैठक ‘कामधेनू गौ अभयारण्य’ नावाच्या आगर-मालवा जिल्ह्यातील गाय अभयारण्यात ‘गोपाष्टमी’ रोजी संपन्न होणार आहे.
-
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात सप्टेंबर २०१७ मध्ये मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेले हे भारतातील पहिले गाय अभयारण्य आहे.
मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.
-
राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.