-
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यामार्फत कॅन्टोन्मेंट बोर्डास ऑनलाईन नागरी सेवा पुरविण्यासाठी 'ई-छावनी (e-Chhawani)' नावाच्या पोर्टलचे तसेच मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रहिवाशांसाठी सुलभ राहणीमानाची सोय करण्यासाठी सदर पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
-
सदर पोर्टलद्वारे देशातील सर्व ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांमधील सुमारे २० लाखांहून अधिक नागरिकांना ऑनलाईन सेवा प्रदान करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.