• केंद्रीय पृथ्वी विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 'डिजीटल ओशन (Digital Ocean)' नावाच्या अ‍ॅप्लिकेशनचे व्हर्च्युअली अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अ‍ॅप हे हैदराबादस्थित भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत (Indian National Centre for Ocean Information Services - INCOIS) विकसित करण्यात आले आहे.

  • डिजीटल ओशन हे महासागर माहिती व्यवस्थापनाशी संबंधित अशा प्रकारचे पहिलेच अ‍ॅप आहे.

INCOIS बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: INCOIS म्हणजेच Indian National Centre for Ocean Information Services अर्थात भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र होय.

  • स्थापना वर्ष: १९९८ साली INCOIS ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: प्रगती नगर, हैदराबाद हे INCOIS च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.