• ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत कोविड अनाथ मुलांचे शिक्षण, आरोग्य तसेच देखभाल याकरिता ‘आशीर्वाद (Ashirbad)’ नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पालकांच्या मृत्यूनंतर मुलांची जबाबदारी स्वीकारलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात दरमहा २५०० रुपये जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.