• चंदीगड रेल्वे स्टेशनला (Chandigarh Railway Station - CRS) नुकतेच '५ स्टार ईट राईट स्टेशन (Five-star Eat Right Station)' प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • प्रवाशांना उच्च दर्जाचे तसेच पौष्टिक अन्न पुरवण्याच्या कृतीबद्दल सदर प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

  • जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर श्रेणी सुधारित करण्याच्या उद्देशासाठी चंदीगड रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली आहे.

चंदीगढबाबत महत्वपूर्ण माहिती

  • प्रशासक: व्ही.पी. सिंग बदनोरे हे सध्या चंदीगढच्या प्रशासक पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९६६ रोजी चंदीगढची स्थापना करण्यात आली होती.