• ८ सप्टेंबर २०२० रोजी पहिली जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषद संपन्न झाली. सदर शिखर परिषदेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्दे

  • सदर परिषदेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पुढच्या पिढीतील तंत्रज्ञान यांकडे लक्ष देणे होय.

  • अशा तंत्रज्ञानाच्या अभ्यासामुळे सौर ऊर्जा अधिक कार्यक्षमतेने बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल अशी अपेक्षा आहे.

  • १४९ देशांमधील जवळपास २६००० हून अधिक जण या शिखर परिषदेत सहभागी झाले होते.

  • नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मायकेल स्टेनली व्हिटिंगहॅम यांनीही महत्वपूर्ण स्वरूपाचे भाषण सादर केले.

आंतरराष्ट्रीय सौर युतीबाबत (International Solar Alliance - ISA) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २०१५ मध्ये ISA ची स्थापना झाली होती.

  • स्थापनेचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे आंतरराष्ट्रीय सौर युतीची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम, हरियाणा हे ISA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • महासंचालक: उपेंद्र त्रिपाठी हे सध्या महासंचालक पदावर विराजमान आहेत.