• पहिला भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय संवाद व्हर्च्युअल स्वरूपात नुकताच पार पडला.

ठळक मुद्दे

  • शांतीपूर्ण, सुरक्षित आणि नियमाधारित इंडो-पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यासाठी सदर संवाद घडवून आणण्यात आला आहे.

  • सदर ३ देशांमध्ये एकमेकांमधील मजबूत द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी आणि आपापल्या सामर्थ्यांशी समन्वय साधण्याच्या उद्देशाने या संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

  • भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रिंगला, फ्रान्सचे युरोपकरिताचे मंत्रालय व परराष्ट्र व्यवहार सचिव-सरचिटणीस असलेले फ्रान्सॉईस डेलात्रे आणि ऑस्ट्रेलियन परराष्ट्र व्यवहार व व्यापार सचिव फ्रान्सिस अ‍ॅडमसन यांच्या अध्यक्षतेखाली हा संवाद व्हर्च्युअल स्वरूपात पार पडला.