• भारतातील पहिली लिथियम रिफायनरी लवकरच गुजरातमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • मणिकरण पॉवर लिमिटेड (Manikaran Power Limited) या देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा व्यापार आणि नवीकरणयोग्य ऊर्जा कंपनीमार्फत रिफायनरी उभारण्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.

  • बॅटरी-ग्रेड सामग्री तयार करण्यासाठी रिफायनरीमध्ये लिथियम धातूवर प्रक्रिया करण्यात येईल.

  • लिथियम हा एक दुर्मिळ घटक असून सामान्यत: तो भारतात आढळत नाही.

  • सदर प्रकल्पाद्वारे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने गुजरातला लिथियम बॅटरीच्या घरगुती उत्पादनात कच्चा माल पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.