• उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी हे सार्वजनिक वाहतुकीमध्ये रोपवे सेवा वापरणारे भारतातील पहिले शहर बनले आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक स्तरावर विचार करता बोलिव्हिया आणि मेक्सिको सिटीनंतर सार्वजनिक वाहतुकीमध्ये रोपवे वापरणारे वाराणसी हे जगातील तिसरे शहर बनले आहे.

  • सदर रोपवे प्रकल्पाची एकूण प्रस्तावित किंमत ४२४ कोटी रुपये इतकी आहे.

उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.