• 'संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organization - DRDO)' नुकतीच 'ABHYAS' नावाच्या 'हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेटची (High-speed Expendable Aerial Target - HEAT)' यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर चाचणी ही ओडिशातील बंगालच्या उपसागराच्या किनार्‍यावरील चंडीपूरच्या एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) येथून घेण्यात आली आहे.

  • लक्ष्य विमान नेव्हिगेशनसाठी MEMS-आधारित 'इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम (Inertial Navigation System - INS)' ने सुसज्ज आहे.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organization अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.