• भारतीय नौदल आणि रशियन नौदलादरम्यान होणाऱ्या द्विवार्षिक द्विपक्षीय सागरी युद्ध अभ्यास 'इंद्र' च्या ११ व्या आवृत्तीची बंगालच्या उपसागरात सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर द्विवार्षिक द्विपक्षीय सागरी सराव ४ ते ५ सप्टेंबर २०२० या कालावधीत बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.

  • 'इंद्र' या सागरी युद्ध अभ्यासामुळे २ देशातील नौदलांमधील दीर्घकालीन सामरिक संबंध दृढ होणे अपेक्षित आहे.

  • सदर अभ्यासाद्वारे गेल्या काही वर्षांमध्ये २ देशांच्या नौदलांमार्फत तयार करण्यात आलेल्या आंतर-संचालन क्षमता एकत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

  • कोविड-१९ मुळे यावर्षी निर्बंधांसह द्विपक्षीय सागरी अभ्यास केवळ समुद्रावर, संपर्क न करता अशा स्वरूपात घेण्यात येईल.

महत्वपूर्ण माहिती

  • रशियाचे अध्यक्ष: व्लादिमीर पुतिन हे सध्या रशियाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

  • भारतीय नौदल प्रमुख: अ‍ॅडमिरल करंबीर सिंग सध्या भारतीय नौदल प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.