-
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतर्फे (Defence Research and Development Organisation - DRDO) ओडीशा किनाऱ्यावरील चाचणी रेंजमधून पिनाका (PINAKA) रॉकेट सिस्टमच्या वर्धित आवृत्तीची यशस्वीरित्या उड्डाण चाचणी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
पिनाका रॉकेटची ही वर्धित आवृत्ती सध्याच्या पिनाका एमके - १ (Pinaka Mk-I) रॉकेट्सची जागा घेईल अशी अपेक्षा आहे.
-
पूर्वीच्या एमके - १ चा पल्ला ४० किमी होता तर नवीन आवृत्तीमध्ये ४५ ते ६० किमी अंतरावरील लक्ष्य गाठण्याची क्षमता आहे.
-
पिनाकाची रचना व विकास शस्त्रास्त्र संशोधन व विकास आस्थापना (Armament Research and Development Establishment - ARDE) आणि उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (High Energy Materials Research Laboratory - HEMRL) या पुण्यामध्ये असलेल्या DRDO प्रयोगशाळांनी केला आहे.
DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.
-
अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.