-
गुजरातचे मुख्यमंत्री श्री. विजय रुपाणी यांच्यामार्फत नुकतेच 'ईनगर (eNagar)' मोबाईल अॅप्लिकेशन आणि पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर अॅप्लिकेशनमध्ये मालमत्ता कर, व्यवसाय कर तसेच तक्रार निवारण यांसारख्या ५२ सेवांसह १० मॉड्यूल समाविष्ट करण्यात आले आहेत.
गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.