• इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटमार्फत (Economist Intelligence Unit - EIU) जाहीर करण्यात आलेल्या २०२० च्या लोकशाही निर्देशांकात १६७ देशांच्या यादीमध्ये भारत ५३ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • ० - १० या स्केलनुसार निर्देशांकामध्ये भारताची एकूण गुणसंख्या ६.६१ इतकी आहे.

  • भारताचे वर्गीकरण ‘सदोष लोकशाही (flawed democracy)’ म्हणून करण्यात आले आहे.

  • EIU मार्फत जाहीर करण्यात आलेली जागतिक लोकशाही निर्देशांक क्रमवारी जागतिक स्तरावरील सध्याच्या लोकशाहीची स्थिती दर्शविते.

  • सदर निर्देशांकात नॉर्वे अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

  • या यादीमध्ये आईसलँड, स्वीडन, न्यूझीलंड आणि कॅनडा हे अव्वल क्रमवारीतील देश आहेत.

EIU बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: EIU म्हणजेच Economist Intelligence Unit अर्थात इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: लंडन, युनायटेड किंगडम हे EIU च्या आहे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९४६ साली EIU ची स्थापना करण्यात आली होती.

  • पालक संस्था: इकॉनॉमिस्ट ग्रुप ही EIU ची पालक संस्था आहे.