-
विप्रो लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष असणाऱ्या अझीम प्रेमजी यांनी एडेलगीव्ह हुरुन भारतीय परोपकार यादी (Edelgive Hurun India Philanthropy List ) २०२० मध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
ठळक मुद्दे
-
एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत ७९०४ कोटी रुपयांचे सर्वाधिक योगदान अझीम प्रेमजी यांनी केले आहे.
-
HCL टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि चेअरमन शिव नादर ७९५ कोटी रुपये देणगीसह सदर यादीत दुसर्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.
-
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ४५८ कोटी रुपये देणगीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
-
सदर यादीत ७ महिलांना स्थान प्राप्त झाले आहे ज्यामध्ये रोहिणी निलेकणी ४७ कोटी रुपये देणगीसह भारतातील सर्वात उदार महिला ठरल्या आहेत.
-
त्यानंतर अनु आगा आणि Thermax कुटुंब (३६ कोटी रुपये) आणि बायोकॉनच्या किरण मजुमदार शॉ (३४ कोटी रुपये) यांनी स्थान प्राप्त केले आहे.