• आर्थिक विज्ञान विभागामधील (Economic Sciences) २०२० सालाचे नोबेल पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे

  • रॉयल स्वीडीश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसमार्फत (The Royal Swedish Academy of Sciences) पॉल आर. मिलग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांना आर्थिक विज्ञान विभागामधील (Economic Sciences) २०२० सालाचे नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

  • 'लिलाव सिद्धांतातील सुधारणांबद्दल आणि नवीन लिलाव स्वरूपाच्या शोधांबद्दल (for improvements to auction theory and inventions of new auction formats)' सदर पुरस्कार देण्यात येणार आहे.

पॉल आर. मिलग्रोम यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • १९७९ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी (Stanford University), यूएसए मधून पीएच. डी. धारक

  • मानविकी आणि विज्ञान (Humanities and Sciences) या विषयांचे प्राध्यापक

रॉबर्ट बी. विल्सन यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • १९६३ साली हार्वर्ड विद्यापीठ (Harvard University), यूएसए मधून डी. बी. ए. धारक

  • स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी (Stanford University), यूएसए येथे अ‍ॅडम्स डिस्टींग्विश्ड प्रोफेसर ऑफ मॅनेजमेंट

आर्थिक विज्ञानातील नोबेल पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती

  • १९६८ साली सेवेरिगेस रिक्सबँक या स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेमार्फत (Sveriges Riksbank - Sweden’s central bank) नोबेल पुरस्काराचे संस्थापक जनक असणाऱ्या अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ आर्थिक विज्ञान विभागामधील (Economic Sciences) पुरस्कारांची स्थापना करण्यात आली होती.

  • १९६९ सालामध्ये पहिल्यांदा आर्थिक विज्ञान विभागामधील पहिले पारितोषिक रॅगनर फ्रिश आणि जान टिनबर्गेन यांना प्रदान करण्यात आले होते.