• आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत (International Monetary Fund - IMF) भारताची आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी ९.५% टक्के आर्थिक वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अंदाज हा १२.५ टक्क्यांवरून ९.५ टक्क्यांपर्यंत आणण्यात आला आहे.

  • जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाबतीत IMF मार्फत २०२१ मध्ये ६ टक्के आणि २०२२ मध्ये ४.९ टक्के वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

IMF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IMF म्हणजेच International Monetary Fund अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी होय.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली IMF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • व्यवस्थापकीय संचालक: क्रिस्टलिना जॉर्जिएवा या पदावर विराजमान आहेत.

  • सदस्य देश: IMF चे १८९ सदस्य देश आहेत. अँडोरा नुकताच १९० वा सदस्य म्हणून सामील झाले आहे.