• दिग्गज शिक्षक इब्राहीम अलकाझी यांचे निधन झाले. अलकाझी हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे प्रदीर्घ सेवा देणारे संचालक होते.

ठळक मुद्दे

  • अलकाझीनी नसरुद्दीन शाह, रोहिणी हट्टंगडी, सुरेखा सिक्री, ओम पुरी आणि पंकज कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या पिढ्यांना मार्गदर्शन केले.

  • १९५० मध्ये त्यांनी बीबीसी ब्रॉडकास्टिंग पुरस्कारही (BBC Broadcasting Award) जिंकला होता.

  • इब्राहिम अलकाझी हे एक दिग्दर्शक आणि दिग्गज नाटक शिक्षक होते. त्यांनी गिरीश कर्नाड यांचे 'तुघलक' आणि धर्मवीर भारती यांचे 'अंधा युग' यांसारख्या नाटकांची निर्मिती केली.

  • त्यांना १९६६ मध्ये पद्मश्री पुरस्कार तर १९९१ मध्ये पद्मभूषण प्राप्त झाला होता. २०१० मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.