-
कामगार आणि रोजगार मंत्रालयामार्फत (Ministry of Labour & Employment) असंघटित कामगारांना केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे राबवल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यासाठी 'ई-श्रम (e-Shram)' नावाच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
श्रम आणि रोजगार मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांच्यामार्फत सदर पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
-
असंघटित कामगार या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेऊ शकतात.