-
UAE सरकारमार्फत AGRIOTA या नवीन तंत्रज्ञान-आधारित कृषी वस्तू व्यापार मंचाचे अनावरण करण्यात आले आहे. भारतीय ग्रामीण शेतकरी आणि UAE अन्न उद्योगात भर घालण्यासाठीचे ई-मार्केट व्यासपीठ म्हणून हे भूमिका बजावेल.
ठळक मुद्दे
-
शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या या ई-मार्केट व्यासपीठामुळे मध्यस्थांशी संपर्क न साधता त्यांना थेट UAE अन्न उद्योगाशी संपर्क साधण्यास परवानगी मिळते.
-
या उपक्रमाद्वारे पुरवठा साखळीस अनुकूलता प्रदान होऊन सर्व भागधारकांना योग्य मूल्य निर्मिती प्रदान करण्यात येते.
-
सदर व्यासपीठाद्वारे UAE चा जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक (Global Food Security Index) सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकाबाबत (Global Food Security Index) महत्वपूर्ण माहिती
-
२०१९ सालामध्ये जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकाबाबत भारत ११३ देशांच्या क्रमवारीमध्ये ७२ व्या क्रमांकावर होता.
-
सिंगापूर हा २०१९ सालामध्ये प्रथम क्रमांकावर स्थित होता.
-
सिंगापूरनंतर आयर्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड आणि फिनलँड या देशांचा क्रम लागतो.
-
जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक पहिल्यांदा २०१२ साली प्रकाशित करण्यात आला होता.