• निवडणूक आयोगामार्फत नुकतेच मतदारांच्या छायाचित्र ओळखपत्राच्या 'e-EPIC' नावाच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ही इलेक्ट्रॉनिक आवृत्ती मोबाईल फोनवर साठवली जाऊ शकते तसेच वैयक्तिक संगणकावर डाऊनलोडदेखील केली जाऊ शकते.

  • सदर दस्तऐवजाला वेगवान वितरण आणि सुलभ प्रवेश प्रदान करण्याची ही नवीन कल्पना आहे.

ECI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ECI म्हणजेच Election Commission of India अर्थात भारतीय निवडणूक आयोग

  • मुख्य निवडणूक आयुक्त: सुनील अरोरा हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.