• भारतीय लघु उद्योग विकास बँकेमार्फत (Small Industries Development Bank of India - SIDBI) नुकतेच 'डिजीटल प्रयास (Digital Prayaas)' नावाच्या कर्ज पुरवठा व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • कमी उत्पन्न गटांतील उद्योजकांना कर्ज सुलभ करण्याच्या मुख्य उद्देशपूर्तीसाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

SIDBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: SIDBI म्हणजेच Small industrial Development Bank of India अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँक होय.

  • स्थापना वर्ष: SIDBI ची स्थापना २ एप्रिल १९९० रोजी झाली होती.

  • संस्थेचे स्वरूप: 'भारतातील एक विकास वित्तीय संस्था' या स्वरूपात सध्या SIDBI कार्यरत आहे.

  • मुख्यालयाचे ठिकाण: SIDBI चे मुख्यालय लखनौ, उत्तर प्रदेश येथे आहे.

  • संस्थेचा उद्देश: उद्योगांना पुनर्वित्त सुविधा आणि अल्प मुदतीसाठी कर्ज देऊ करणे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करणे हा SIDBI चा मुख्य उद्देश आहे.