• बँक ऑफ बडोदामार्फत (Bank of Baroda) नुकतेच 'बॉब वर्ल्ड (bob World)' नावाच्या डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सर्व बँकिंग सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हे सदर प्लॅटफॉर्मचे मुख्य उद्दिष्ट आहे.

बँक ऑफ बडोदा बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: वडोदरा, गुजरात येथे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: हसमुख अधिया सध्या बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संजीव चड्ढा हे सध्या या पदावर कार्यरत आहेत..

  • स्थापना वर्ष: २० जुलै १९०८ रोजी बँक ऑफ बडोदाची स्थापना करण्यात आली होती.

  • संस्थापक: सयाजीराव गायकवाड तिसरे हे बँक ऑफ बडोदाचे संस्थापक आहेत.