• भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमार्फत (Indian Space Research Organization - ISRO) बेंगलोरच्या पेन्या येथे ISTRAC कॅम्पसमध्ये ‘नेत्र (NETRA)’ नावाच्या एका समर्पित अवकाश परिस्थिती जागरूकता (Space Situational Awareness - SSA) नियंत्रण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • SSA नियंत्रण केंद्र ‘नेत्र (NETRA)’ चे उद्घाटन ISRO चे अध्यक्ष के. सिवन यांच्या हस्ते संपन्न झाले.

ISRO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.

  • सध्याचे अध्यक्ष: के. सिवन हे सध्या ISRO च्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक हे ISRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.