• सिक्कीमची लाल मिरची जी स्थानिक पातळीवर 'डल्ले खुर्सानी' म्हणून ओळखली जाते तिला नुकताच भौगोलिक निर्देशांक  (Geographical IndicationGI Tag) प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • 'केंद्रीय उद्योग प्रोत्साहन व अंतर्गत व्यापार विभागामार्फत (Union department of Industry promotion and internal trade)' भौगोलिक निर्देशांक (GI Tag) प्रदान करण्यात आला आहे.

  • 'डल्ले खुर्सानी' ही जगातील सर्वात तिखट मिरच्यांपैकी एक म्हणून गणली जाते.

जीआय (Geographical Indication - GI) टॅग बाबत महत्वपूर्ण माहिती

  • भारतातील भौगोलिक निर्देशांक नोंदणी ही 'वस्तूंची भौगोलिक नोंदणी आणि संरक्षण अधिनियम (Geographical Indications of Goods (Registration and Protection Act), १९९९' द्वारे केली जाते जी सप्टेंबर २००३ पासून अंमलात आणली गेली.

  • GI टॅगमुळे उत्पादनांचा बेकायदेशीर वापर होण्यापासून संरक्षण मिळते आणि स्थानिक उत्पादकांना त्याचा फायदा होतो.

  • भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालयाचे मुख्यालय चेन्नई, तमिळनाडू येथे आहे.

सिक्कीम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: प्रेमसिंग तमांग हे सध्या सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: गंगा प्रसाद हे सध्या सिक्कीम राज्याच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • राजधानी: गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे.