-
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना नुकतेच ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठीत ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ठळक मुद्दे
-
अभिनेता, निर्माता तसेच पटकथा लेखक म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सदर पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
-
त्यांना उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इतर पुरस्कार विजेते
-
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: मरक्कर: लायन ऑफ द अरेबियन सी (मल्याळम)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता: मनोज बाजपेयी (भोंसले - हिंदी) आणि धनुष (असुरन - तमिळ)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: कंगना रणौत (पंगा - हिंदी) आणि मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (हिंदी)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी (ताश्कंद फाइल्स - हिंदी)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजय सेतुपती (सुपर डिलक्स - तमिळ)
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: संजय पूरण सिंह चौहान (बहत्तर हुरैन - हिंदी)
-
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: गिरीश गंगाधरन (जल्लीकट्टू - मल्याळम)
-
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट: कस्तुरी (हिंदी)
-
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: आनंदी गोपाळ (मराठी)
-
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका: सावनी रवींद्र (बार्डो - मराठी)
-
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: बी प्राक (केसरी - हिंदी)
-
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: छिछोरे
-
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: बार्डो
-
सर्वाधिक चित्रपट अनुकूल राज्य: सिक्कीम