• केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते कोविड-१९ वर आधारित 'कोरोना फाइटर्स (The Corona Fighters)' नावाच्या गेमचे अनावरण करण्यात आले आहे. संसर्गापासून बचाव करण्याच्या उद्देशाने वास्तविक जगातील खेळाडूंच्या कृतींवर प्रभाव टाकण्याकरिता ही गेम सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • दैनंदिन जीवनात योग्य खबरदारी घेण्यासाठी लोकांना जागरूक करणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

  • सदर गेम ही एक नवीन आणि अत्यंत सर्जनशील पद्धत आहे जी लोकांना कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी योग्य साधने वापरणे तसेच आचरणात आणावयाच्या योग्य बाबी शिकवते.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाबात महत्वपूर्ण माहिती

  • केंद्रीय मंत्री: डॉ. हर्ष वर्धन हे सध्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

  • आरोग्य राज्यमंत्री: अश्विनी कुमार चौबे हे सध्या आरोग्य राज्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९७६ साली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे मंत्रालयाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.