-
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ‘DIPCOVAN’ नावाच्या कोविड - १९ अँटीबॉडी शोधक किटचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
९७% इतक्या उच्च संवेदनशीलतेसह सदर किट सशक्त बनविण्यात आली आहे.
-
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research) त्याला मान्यता देण्यात आली आहे.
DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.
-
अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.