• उत्तराखंड राज्यात नुकतेच भारतातील सर्वात मोठ्या सुगंधी बागेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर बाग ही नैनिताल जिल्ह्यात स्थित आहे.

  • उत्तराखंड वन विभागाच्या संशोधन शाखेमार्फत सदर सुगंधी उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

  • या बागेत संपूर्ण भारतातील १४० विविध प्रजातींच्या सुगंधी प्रजाती उपलब्ध आहेत.

उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: पुष्कर सिंग धामी हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: गुरमित सिंग हे सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.