• दिल्लीचे मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांच्यामार्फत देशातील पहिल्या 'स्मॉग टॉवरचे (Smog Tower)' उद्घाटन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • कॅनॉट प्लेसच्या बाबा खरक सिंह मार्ग येथे या टॉवरची उभारणी करण्यात येत आहे.

  • स्मॉग टॉवर हवा स्वच्छ करण्याबरोबरच PM २.५ आणि PM १० ची पातळी कमी करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.

दिल्लीबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: अरविंद केजरीवाल हे सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • ले. गव्हर्नर: अनिल बैजल हे सध्या दिल्लीच्या ले. गव्हर्नर (Lieutenant Governor) पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वैशिष्ट्य: १९११ साली दिल्लीची राजधानी म्हणून निर्मिती करण्यात आली होती. केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्मिती १९५६ साली करण्यात आली होती. दिल्लीला 'राष्ट्रीय राजधानी प्रदेश (National Capital Territory - NCT)' दर्जा १ फेब्रुवारी १९९२ रोजी प्रदान करण्यात आला होता.