-
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे.
ठळक मुद्दे
-
अँडरसनने न्यूझीलंडकडून १३ कसोटी, ४९ एकदिवसीय आणि ३१ टी - २० सामने खेळले आहेत.
-
त्याने २ शतके आणि १० अर्धशतकांसह ९० बळी घेत २२७७ धावा केल्या आहेत.
-
जानेवारी २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३६ चेंडूत सर्वात वेगवान शतक फटकावल्यानंतर अँडरसनने प्रसिद्धी मिळविली होती.
-
जानेवारी २०१५ मध्ये एबी डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरूद्ध ३१ चेंडूत शतक करत हा विक्रम मोडीत काढला होता.