• केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री श्री. हर्ष वर्धन यांच्यामार्फत चेन्नई बंदरात किनारपट्टी संशोधन जहाज (Coastal Research Vehicle - CRV) ‘सागर अन्वेशिका (Sagar Anveshika)’ चे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर जहाजाचा वापर किनारी तसेच किनारपट्टी अशा दोन्ही भागात जल पर्यावरण चाचणीसोबत पाण्याखालील वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी केला जाईल अशी अपेक्षा आहे.

  • राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या (National Institute of Ocean Technology - NIOT) संशोधन कार्यात या पद्धतीचा उपयोग करण्यात येईल.

NIOT बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NIOT म्हणजेच National Institute of Ocean Technology अर्थात राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: चेन्नई, तमिळनाडू येथे NIOT च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.