-
२०१५ सालामधील पॅरिस हवामान करारावर (Paris Climate Agreement) स्वाक्षरी करण्याच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त युनायटेड किंगडम आणि संयुक्त राष्ट्रसंघ १२ डिसेंबर २०२० रोजी जागतिक हवामान शिखर परिषद (Global Climate Summit) आयोजित करणार आहेत.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटनिओ गुटेरेस आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे या कार्यक्रमाचे सहसंयोजक असतील.
-
सदर परिषद राष्ट्रीय सरकारांना अधिक महत्वाकांक्षी आणि उच्च-गुणवत्तेच्या हवामान योजना सादर करण्यासाठी आमंत्रित करेल अशी अपेक्षा आहे.
संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
युनायटेड किंगडमबाबत महत्वपूर्ण माहिती
-
पंतप्रधान: बोरिस जॉनसन हे सध्या युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान पदावर आहेत.
-
राजधानी: लंडन ही युनायटेड किंगडमची राजधानी आहे.