-
अलका नांगिया अरोरा यांची नुकतीच 'राष्ट्रीय लघु उद्योग निगम लिमिटेड (National Small Industries Corporation Ltd. - NSIC)' च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
त्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.
NSIC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NSIC म्हणजेच 'National Small Industries Corporation Ltd.' अर्थात 'राष्ट्रीय लघु उद्योग निगम लिमिटेड' होय.
-
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक: अलका नांगिया अरोरा या सदर पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NSIC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९५५ मध्ये NSIC ची स्थापना करण्यात आली होती.