• उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या हस्ते नुकतेच सूर्यधर तलावाचे उद्घाटन संपन्न झाले आहे.

ठळक मुद्दे

  • सूर्यधर तलावाची क्षमता ७७००० घनमीटर इतकी आहे.

  • राज्यातील १८ - २० गावांना पिण्याचे पाणी पुरविणे तसेच सिंचनाची गरज भागविणे यासाठी हा तलाव अत्यंत सहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा आहे.

  • सदर भागातील जलसंपत्ती सुधारण्यास आणि स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करून आरोग्यदायी परिसंस्था निर्माण करण्यास तलावाच्या माध्यमातून मदत होईल अशी अपेक्षा आहे.