-
निती आयोगामार्फत स्वदेशी विकसित ‘डिजीबॉक्स (DigiBoxx)' नावाच्या भारतातील पहिल्या डिजीटल मालमत्ता व्यवस्थापन आणि साठवण मंचाचे (Digital Asset Management and Storage Platform) अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
भारताचा स्वतःचा क्लाऊड स्टोरेज प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टीकोनास सदर उपक्रमामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
-
सदर सेवा डेस्कटॉप, iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे.
-
डिजीबॉक्समार्फत फक्त ३० रुपयांमध्ये २० GB क्लाऊड स्टोरेज स्पेस आणि दरमहा १०० जीबी स्पेस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
NITI आयोगाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NITI म्हणजेच National Institution for Transforming India अर्थात भारत परिवर्तनासाठी राष्ट्रीय संस्था होय.
-
स्थापना वर्ष: १ जानेवारी २०१५ साली नीती आयोगाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे नीती आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाच्या अध्यक्ष पदावर आहेत.
-
उपाध्यक्ष: राजीव कुमार हे नीती आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर आहेत.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत हे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.