• न्यूझीलंड देशामार्फत नुकतीच 'हवामान आणीबाणी (Climate Emergency)' जाहीर करण्यात आली असून २०२५ पर्यंत कार्बन तटस्थ (Carbon Neutral) सार्वजनिक क्षेत्र निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • हवामान आणीबाणी जाहीर करण्यात आलेल्या इतर ३२ देशांच्या यादीमध्ये आता न्यूझीलंड समाविष्ट झाला आहे.

  • कॅनडा, जपान, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांचा सदर यादीत समावेश आहे.

न्यूझीलंड बाबत महत्वपूर्ण माहिती

  • पंतप्रधान: जॅकिंडा आर्डर्न या सध्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत.

  • राजधानी: वेलिंग्टन ही न्यूझीलंडची राजधानी आहे.