-
नुआखाई हे दोन शब्दांचे मिश्रण आहे ज्यात नवीन तांदूळ खाण्याचा अर्थ आहे. नुआ म्हणजे नवीन आणि खाई म्हणजे खाणे असा अर्थ यातून प्रतीत होतो. या उत्सवाच्या वेळी अन्नधान्यांची पूजा करण्यात येते.
ठळक मुद्दे
-
ओडिशा, छत्तीसगड आणि शेजारच्या प्रदेशांमध्ये नुआखाई जुहर उत्सव साजरा करण्यात आला.
-
भारतात साजरा करण्यात येणारा हा सर्वात प्राचीन स्वरुपाचा उत्सव आहे.
-
हंगामातील नवीन पिकांच्या स्वागतासाठी हा सण साजरा करण्यात येतो.
-
ज्यांच्या प्रयत्नांमुळे देशाला अन्नधान्य आणि पोषण मिळते अशा शेतकर्यांच्या कष्टांचे कौतुक व आनंद साजरा करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो.
नुआखाई जुहरबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नुआखाई जुहर हा एक कृषी महोत्सव आहे ज्याला नुआखाई परब किंवा नुआकाही भेटेघाट असेही संबोधले जाते.
-
लोकांमार्फत या खास सणानिमित्त त्यांच्या संस्कृती आणि परंपरा प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने आपल्या जिल्ह्यात नृत्य आणि लोकगीतांचे आयोजन करण्यात येते.
-
मुख्यतः पश्चिम ओडिशामध्ये नुआखाई जुहर साजरा करण्यात येतो.
-
कोविड -१९ च्या लॉकडाऊनमुळे या वर्षात लोकांनी आपल्या घरीच हा सण साजरा केला.