• नुकतेच चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings - CSK) २०२१ सालच्या 'इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League - IPL)' विजेतेपद पटकावले आहे.

ठळक मुद्दे

  • अंतिम सामन्यात CSK ने कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders- KKR) पराभव करत या विजयाला गवसणी घातली आहे.

  • IPLची ही एकूण १४ वी आवृत्ती होती.

  • यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये IPL स्पर्धेचे जेतेपद पटकाविले होते.

इतर महत्वपूर्ण मुद्दे

  • विजेत्या संघाचा कर्णधार: एम. एस. धोनी (चेन्नई सुपर किंग्ज)

  • उपविजेत्या संघाचा कर्णधार: इऑन मॉर्गन (कोलकाता नाईट रायडर्स)

  • स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: हर्षल पटेल (RCB)

  • सर्वाधिक धावा करणारा फलंदाज (ऑरेंज कॅप): ऋतूराज गायकवाड (संघ: CSK, धावा: ६३५)

  • सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज (पर्पल कॅप): हर्षल पटेल (संघ: RCB, एकूण बळी: ३२)