• लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांच्याकडे नुकताच 'राष्ट्रीय छात्र सेनेच्या (National Cadet Corps - NCC)' ३४ व्या महासंचालक पदाचा पदभार सुपूर्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • ते लेफ्टनंट जनरल तरुण कुमार आयच यांची जागा घेतील.

  • १९८७ मध्ये त्यांची पॅराशूट रेजिमेंटमध्ये (PARACHUTE REGIMENT) नियुक्ती करण्यात आली होती.

NCC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NCC म्हणजेच 'National Cadet Corps' अर्थात 'राष्ट्रीय छात्र सेना' होय.

  • स्थापना वर्ष: १९४८ साली NCC ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NCC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • महासंचालक: लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग हे सध्या NCC महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • बोधवाक्य: 'एकता और अनुशासन (Unity and Discipline)' हे NCC चे बोधवाक्य आहे.