-
लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी नुकताच ३ सेवा प्रमुखांचा समावेश असलेल्या 'चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या (Chiefs of Staff Committee)' अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
ठळक मुद्दे
-
८ डिसेंबर रोजी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सदर पद रिक्त झाले होते.
-
सेवा ज्येष्ठतेच्या कारणास्तव जनरल नरवणे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.