• केंद्र सरकारमार्फत नुकतीच अलका उपाध्याय यांची 'भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highways Authority of India - NHAI)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • उपाध्याय या मध्य प्रदेश केडरच्या १९९० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

  • त्या सध्या ग्रामीण विकास विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.

NHAI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NHAI म्हणजेच National Highways Authority of India अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण होय.

  • स्थापना वर्ष: १९९५ साली NHAI ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NHAI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • उद्दिष्ट: राष्ट्रीय महामार्गांचा विकास व देखभाल करणे हे NHAI चे महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे.

  • ब्रीदवाक्य: 'Not just Roads, building a Nation' हे NHAI चे ब्रीदवाक्य आहे.