• सज्जन जिंदाल यांची नुकतीच 'जागतिक स्टील संघटनेच्या (World Steel Association - WSA)' अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नियुक्ती ही २०२१-२२ वर्षासाठी करण्यात आली आहे.

  • सज्जन जिंदाल हे सध्या JSW स्टील लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

  • जिंदाल हे जागतिक स्टील संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करणारे भारतातील पहिले प्रतिनिधी ठरले आहेत.

WSA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: WSA म्हणजेच 'World Steel Association' अर्थात 'जागतिक स्टील संघटना' होय.

  • स्थापना वर्ष: १९६७ साली WSA ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: ब्रुसेल्स, बेल्जियम हे WSA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.