-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) प्रदीप कुमार पंजा यांची नुकतीच कर्नाटक बँक लिमिटेडच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
३ वर्षे कालावधीसाठी ते अर्धवेळ गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका सुरू करतील.
-
ते मावळते अध्यक्ष पी. जयराम भट यांची जागा घेतील.
कर्नाटक बँक लिमिटेडबाबत महत्वपूर्ण माहिती
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: महाबळेश्वर एम. एस. हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मंगलुरू, कर्नाटक हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: फेब्रुवारी १९२४ मध्ये सदर बँकेची स्थापना करण्यात आली होती.
-
बँकेची टॅगलाईनः ‘Your Family Bank Across India’ ही बँकेची टॅगलाईन आहे.