-
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र कौशल्य परिषदेच्या (Electronics Sector Skill Council of India - ESSCI) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर पीव्हीजी मेनन यांची नेमणूक करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ESSCI च्या कारभारावर देखरेख ठेवण्यास मेनन हे जबाबदार असतील अशी अपेक्षा आहे.
-
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (National Skill Development Corporation - NSDC) तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय (Ministry of Electronics and IT) यांसह कौशल्य आणि पुनर्कौशल्य सेवा प्रदान करण्यासाठी ESSCI कार्य करते.
ESSCI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ESSCI म्हणजेच Electronics Sector Skill Council of India अर्थात भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र कौशल्य परिषद होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे ESSCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.